पंचगव्याचे फायदे

                                                            //ॐ//
नमस्कार  मित्रांनो.
पंचगव्य म्हणजे गाईची पाच उत्पादने. दूध, दही, तूप, गोमूत्र व शेण. ही गाईची पाच उत्पादने विशिष्ट प्रमाणात एकत्र केलेल्या मिश्रणाला पंचगव्य म्हणतात. या पंचगव्याचे वनस्पतींना मिळणारे फायदे त्याची वनस्पतींसाठी असणारी त्याची उपयुक्तता, आवश्यकता किती आवश्यक आहे, ते आज तुम्हाला सांगणार आहे.
सृष्टीतील सर्व सजीवांच्या सुखी व आरोग्यपूर्ण जीवनासाठी पंचगव्य किती उपयुक्त आहे, आवश्यक आहे हे वृक्षयुर्वेदामधे संगीतलेले आहे. “वृक्षायुर्वेद”, हा ग्रंथ त्यासाठी ज्ञानाचे भांडार आहे. नैसर्गिक उत्पादने वापरून कशी उत्तम पिके घ्यावीत ह्याबद्दल त्यात भरपूर माहिती दिलेली आहे. पंचमहाभूतांशी संतुलन साधून फायद्याची शेती कशी करावी हे त्यात सांगितले आहे. जेव्हा माणूस, प्राणी आणि वनस्पती निसर्गाशी जुळवून घेऊन रहात होते तेव्हा सृष्टीमधे आजार नव्हते. माणसांनी नैसार्गिक साधन संपत्तीचा नाश करायला सुरुवात केली आणि नैसर्गिक जीवनपद्धतीपासून तो दूर गेला तेव्हा पासून पंचमहाभूतांमधे असंतुलन निर्माण झाले आणि सर्वप्रथम त्याचा परिणाम सजीवांच्या आरोग्यावर, स्वास्थ्यावर होऊ लागला. काळाच्या ओघात सजीवांच्या आरोग्याबरोबरच जमिनीचे, जमिनीतील उपयुक्त सूक्ष्म जीवांचे आरोग्य सुध्दा बिघडले. रासायनिक शेतीमुळे तर ही परिस्थिती अजूनच गंभीर बनली.
पंचगव्य हे सर्व सजीवांची सुरक्षा करणारे एक अत्युत्तम तंत्रज्ञान आहे. देशी गाईची पाच उत्पादने – शेण, गोमुत्र, दूध, दही, तूप यांद्वारे वनस्पतींची चांगली वाढ करणे, त्यांची रोगप्रतीरोधक क्षमता वाढवणे आणि सकस व दर्जेदार उत्पादन हि महत्त्वाची कामे पंचगव्य करते. पंचगव्य हे दैवीय शक्ती आणि मर्त्य जिवांना जोडणारा दुवा आहे. त्यामुळे त्याचा वापर पितरांच्या श्राद्ध विधींमध्ये, वास्तुशांती करताना दुष्ट शक्तींचा बिमोड करण्यासाठी तसेच महाशिवरात्रीला प्रसाद म्हणून आज ही केला जातो.
अग्नी, वायू, आकाश, पृथ्वी आणि जल ही पंचमहाभूते, ज्यांद्वारे सगळी सृष्टी बनली आहे, ती स्वतःमधे आणि परस्परांमध्ये असंतुलित असतात. त्यामुळे सृष्टीत सर्व प्रकारच्या असमानता दिसतात. ही पंचमहाभूते देशी गाईमधे संतुलित असतात. त्यामुळे आपल्या संस्कृतीमधे देशी गाईला प्रथम पूजेचे स्थान दिले गेले आहे. तिला कामधेनु, म्हणजे मानवजातीला सर्व प्रकारची समृद्धी देणारी म्हटले आहे. या पंचगव्यामधे वैश्विक शक्ती खेचून घेण्याची क्षमता असते. अशा या वैश्विक शक्तीचा स्पर्श जरी झाला तरी सर्व भौतिक, रासायनिक, जैविक आणि मानसिक असंतुलन नाहीसे होते आणि वनस्पतींच्या वाढिला जोमानी सुरवात होते.     
(GA – जिब्रालिक अॅसिड, IAA – इंडॉल अॅसेटीक अॅसिड, EC – इलेक्ट्रिक कंडक्टीव्हिटी)
भौतिक व रासायनिक गुणधर्म – पंचगव्यात जवळ जवळ सर्व महत्वाचे मॅक्रो व मायक्रो पोषक द्रव्य आणि वाढीला चालना देणारे हार्मोन्स (iaa आणि ga), पिकाच्या वाढीला आवश्यक असणारे घटक असतात. महत्वाची पोषक द्रव्ये, जसे नायट्रोजन, फॉस्फरस, पोट्याशियम, सोडियम, कॅल्शीयम, टोटल शुगर्स, रिड्युसिंग शुगर्स, फेनॉल, iaa, ga, इत्यादी घटक पंचगव्यात असतात, जे पिकाचे उत्पादन वाढवतात, वाढिला चालना देतात.
केमिकल कॉम्पोझीशन – (रासायनिक संघटन) – आंबवण्याची क्रिया करणारे सूक्ष्म जिवाणू ऑर्ग्यानिक अॅसिड तयार करतात त्यामुळे पंचगव्याचा ph कमी असतो. हे आपल्याला पोल्युशन डायनॅमिक्स आणि gc अॅनॅलिसिसमधून दिसून येते. 
बायोकेमिस्ट्री – कमी ph, दुग्धजन्य पदार्थ, गुळ किंवा उसाचा रस यांच्या संयुक्त परिणामामुळे यीस्ट आणि लॅक्टोबॅसिलस सारखे आंबवण्याची क्रिया घडवून आणणारे सुक्ष्म जिवाणू पंचगव्यात प्रचंड प्रमाणात असतात. सजीवांमधे घडून येणाऱ्या रासायनिक क्रियांसाठी आवश्यक असणारे घटक जसे ऑर्ग्यानिक अॅसिड, हायड्रोजन पेरॉक्साइड, सूक्ष्म जिवाणुनाशक, हे लॅक्टोबॅसिलस तयार करतात. हे घटक उपद्रवी आणि रोगजंतूंच्या सुक्ष्म जिवाणूंचा नाश करतात. तसेच सजिवांमधे वाढीला चालना देतात.





Comments

Popular posts from this blog

Desi Bulls

गाय के बारे में कुछ रोचक तथ्‍य