आयुर्वेदातील तुपाचे महत्व

आयुर्वेदात तर तुपाला सर्वोच्च असं स्थान आहे . तूप हे एवढं आरोग्यवर्धक आहे की नवजात बाळाला स्तनपानाच्या आधी तुपाचा एक लहान डोस देण्याची आयुर्वेदात तरतूद आहे . मेंदूच्या नर्व्हस सिस्टीम पासून पायाच्या घोट्या पर्यंत मानवी शरीराला तुपाचे असंख्य फायदे आहेत . म्हणून तुपाला इंग्रजी जगतामध्ये ‘ सुपरफूड ’ म्हटलं जातं . काही वर्षांपुर्वीपर्यंत प्रत्येक पदार्थावर तुपाचा गोळा ठेवून तो खाण्याची पद्धत होती , धर्म कोणताही असो , नैसर्गिक पोषण मिळण्यासाठी ताटातील किमान एका पदार्थावर तरी तुप हवेच हा घरातील मोठ्यांचा नियम पाळला जायचा . पण दुधाचा पदार्थ , त्यात तूप म्हटलं की हेल्थ कॉन्शस असणारे वजन वाढण्याच्या भीतीने नाक मुरडतात . रिच लेव्हल फॅट असल्यामुळे वजन वाढीच्या भितीने हल्ली तुप पुर्णपणे वर्ज करणा - यांचं प्रमाण वाढलं आहे . नाक मुरडत जात ते खास करून तरुण वर्गात ! मात्र आपण त्याचे फायदे न पाहता , केवळ त्यामुळे वजन वाढतं हा एकच मुद्दा लक्षात घेतो . चला तर बघूया ने...